पाकिस्तान दौऱ्यावर आम्हाला खूप सुरक्षित वाटत आहे - फाफ डु प्लेसिस - faf du plessis on pakistan tour

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 22, 2021, 12:16 PM IST

Updated : Jan 22, 2021, 12:46 PM IST

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात २६ ते ३० जानेवारीदरम्यान कराची स्टेडियममध्ये कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज फाफ डु प्लेसिसचा हा पाकिस्तानमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. या सामन्यापूर्वी डु प्लेसिसने आपली प्रतिक्रिया दिली. ''या कसोटीपूर्वी, मला खूप सुरक्षित वाटत आहे", असे प्लेसिसने सांगितले. २००९मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोणत्याही कसोटी खेळणाऱ्या संघाने पाकिस्तानचा दौरा केला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानचे सामने संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात येत होते. पाकिस्तानच्या भूमीवर कसोटी खेळण्याची अपेक्षा नव्हती, असे ३६ वर्षीय डु प्लेसिसने कबूल केले.
Last Updated : Jan 22, 2021, 12:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.