VIDEO : डि कॉक म्हणतो, ''कराचीतील पराभव फलंदाजांमुळे'' - South africa's tour to pakistan
🎬 Watch Now: Feature Video
पाकिस्तानविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यासाठी संघ मानसिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉकने दिले आहे. कराची येथे पार पडलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आफ्रिकेला सात गड्यांनी पराभव पत्करावा लागला. ३४ वर्षीय फिरकीपटू नौमानचे पाच आणि यासिर शाहच्या चार बळींमुळे पाकिस्तानने आफ्रिकेला सहज नमवले. या पराभवानंतर डि कॉक पत्रकार परिषदेत बोलत होता.