EXCLUSIVE: मोहम्मद सिराजच्या मोठ्या भावाची 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत - muhammad siraj news
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच देशात चार सामन्याच्या कसोटी मालिकेत २-१ ने पराभूत करण्याचा पराक्रम केला. भारतीय संघाच्या यशात युवा गोलंदाज मोहम्मद सिराजने मोलाची भूमिका निभावली. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव हे अनुभवी गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजने भारतीय संघाच्या गोलंदाजीची कमान यशस्वीपणे पेलली. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते, परंतु वेगवान गोलंदाजाने अंत्यसंस्कारात सामील न होण्याचा निर्णय घेतला आणि तो ऑस्ट्रेलियामध्ये संघाबरोबर राहिला. पहिल्या कसोटीत मोहम्मद शमी जखमी झाला तेव्हा, सिराजला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. आपल्या मुलाने या कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करावे, असे सिराजच्या वडिलांचे स्वप्न होते. मोहम्मद सिराजने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. भारतीय संघाच्या दैदिप्यमान कामगिरीनंतर सर्वस्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे. यादरम्यान, 'ईटीव्ही भारत'ने सिराजच्या मोठ्या भावाशी खास बातचित केली. यात सिराजच्या भावाने दिलखुलास उत्तरे दिली. पाहा खास बातचित...