सुशांत आत्महत्या प्रकरण : सलमानसह १२ सिने निर्मात्यांनाआरोपी बनवणारी याचिका रद्द - निर्मात्यांनाआरोपी बनवणारी याचिका रद्द
🎬 Watch Now: Feature Video
मुजफ्फरपुर सीजेएम न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दाखल झालेली याचिका रद्द केली आहे. आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचा विषय असल्याचे सांगत न्यायालयाने ही याचिका स्वीकारण्यास नकार दिला. सुधिर ओझा यांनी ही याचिका सलमान खान, करण जोहर, एकता कपूरसह १२ चित्रपट दिग्गजांच्या विरोधात दाखल केली होती. यानुसार न्यायालयाने चौकशी करुन प्राथमिकता दाखल करण्याची वकिलाने मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे याचिका कर्त्याने म्हटले आहे.