Sonu Nigam Tested Corona Positive : गायक सोनू निगमला कोरोनाची लागण झाली, मुलगा अन् पत्नीही बाधित - सुपर सिंगर 3
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14103478-1060-14103478-1641382359230.jpg)
मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगमला कोरोनाची लागण झाली ( Sonu Nigam Tested Corona Positive ) आहे. त्याच बरोबर सोनूच्या पत्नीला आणि मुलाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. नुकताच सोशल मीडियावर सोनूने एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये सोनूने चाहत्यांना सांगितले, 'सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा मला कोरोनाची लागण झाली आहे, अनेकांना ही गोष्ट माहित नसेल. मी आत्ता दुबईमध्ये आहे. मी भुवनेश्वर येथे परफॉर्म करण्यासाठी आणि सुपर सिंगर-3 च्या शूटींगसाठी भारतात येणार होतो. त्याआधी मी टेस्ट केली. तेव्हा मला कळाले की मला कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या.'
Last Updated : Jan 5, 2022, 5:32 PM IST