ठाणे/पुणे : संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मदत करण्यात आली आहे. मागील आठवड्यात त्यांनी आर्थिक अडचणींना कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांच्यावर 32 लाख रुपयांचं कर्ज होतं आणि याच विवंचनेत त्यांनी आत्महत्या करून आपला जीव दिला होता. या कर्जाच्या बाबतीत त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये खुलासा केला होता. या संपूर्ण प्रकारामुळं देहूमध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात होती.
संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष मोरे यांच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्रभरात हळहळ व्यक्त केली जात होती. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेल होतं. याचवेळी एकनाथ शिंदे यांनी शिरीष मोरे यांच्या कुटुंबीयांना ही मदत पोहोचवण्याचे आदेश आमदार विजय शिवतारे यांना दिले आहेत. आत्महत्या करण्याच्या आधी शिरीष मोरे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये मित्रमंडळींना, कुटुंबीयांना मदत करण्याचं आवाहन केलेलं होतं. यात आवाहनाला प्रतिसाद देत एकनाथ शिंदे यांनी ही मदत पक्षातर्फे केली जात असल्याचं सांगितलं आहे.
विजय शिवतारे यांच्या मार्फत मोरे कुटुंबियांना आर्थिक मदत : देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. त्यांच्यावर ३२ लाखांच कर्ज होतं. ही कर्जाची रक्कम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांच्या मार्फत मोरे कुटुंबियांना सुपूर्द केली आहे. तर सदरील मदतीबाबत संस्थान कमिटी एक निर्णय घेऊन रक्कम स्वीकारायची की नाही याबाबत विचार करणार आहे असं प्रतिपादन मोरे कुटुंबीयांनी केलंय.
काय म्हणाले विजय शिवतारे? : यावेळी शिवतारे म्हणाले, “देव, देश आणि धर्मासाठी शिरीष महाराज लढले. काही अडचणीमुळं ते आपल्याला सोडून गेले”. ज्या समाजासाठी जनजागृती करत होते. त्या समाजाने माझं देणं फेडावं अस उल्लेख त्यांनी चिठ्ठीत केला होता. त्यांनी ३२ लाखाच्या कर्जाविषयी माहिती दिली असती तो प्रसंग घडू दिला नसता. कर्तव्य आणि नैतिकता म्हणून एकनाथ शिंदे यांनी कर्जाची रक्कम दिली. महाराजांच लक्ष हे हिंदूंना जाग करणं होत. ते धर्म रक्षण करत होते. त्यांनी आत्महत्या करायला नको होत्या. अशा शब्दात विजय शिवतारे यांनी भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा..