हैदराबाद : टीझरनंतर, OPPO नं 20 फेब्रुवारी रोजी सिंगापूरमध्ये होणाऱ्या जागतिक कार्यक्रमात कंपनीचा पुढील फोल्डेबल फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO Find N5 लाँच करण्याची पुष्टी केली आहे. त्याच दिवशी तो चीनमध्ये देखील लाँच होईल. OPPO Watch X2 देखील यावेळी सादर केली जाईल. तुम्ही हा कार्यक्रम थेट लाईव्ह पाहू शकता. कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला हा कार्यक्रम पहाता येईल.
Powerful, durable, and ultra-slim.
— OPPO (@oppo) February 10, 2025
Tune in to the #OPPOFindN5 global launch 🔗 https://t.co/txbbBykES6
📍 19:00 (GMT+8), Feb 20th, Singapore#SlimYetPowerful pic.twitter.com/4uwgY8KRsy
3D-प्रिंटेड टायटॅनियम अलॉय हिंग वापरणारा पहिला फोन
कंपनीचं CPO Pete Lau यांनी अलीकडंच Find N5 च्या आतील स्क्रीनची गॅलेक्सी Z Fold 6 शी तुलना करणारे फोटो पोस्ट केले आहेत. OPPO नं असंही जाहीर केलं आहे, की हा मजबूत 3D-प्रिंटेड टायटॅनियम अलॉय हिंग वापरणारा पहिला फोल्डेबल फोन असेल. हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट SoC द्वारे समर्थित पहिला फोल्डेबल फ्लॅगशिप देखील असेल. हा फोन IPX6, IPX8 आणि IPX9 रेटिंगला समर्थन देणारा पहिलं मॉडेल देखील असेल.
Slimmer, stronger, more powerful 🦾
— OPPO (@oppo) February 10, 2025
Discover the ultra-thin #OPPOFindN5 in Cosmic Black and Misty White.#SlimYetPowerful pic.twitter.com/3Zyzr1ovQN
OPPO Find सिरीजचे प्रमुख झोउ यिबाओ यांनी आधीच पुष्टी केली, की हा फोन 50W वायरलेस चार्जिंगसह येईल. OPPO Find N5 मध्ये 30 प्रमुख घटकांमध्ये 20 नवीन मटेरियल वापरण्यात आलं आहेत. त्याच वेळी, त्याच्या मदरबोर्डची लांबी मागील आवृत्तीच्या तुलनेत 31.4% नं कमी केली आहे. टीझर व्हिडिओमध्ये फोन मिस्टी व्हाइट आणि कॉस्मिक ब्लॅक रंगात काचेच्या फिनिशसह दाखवला असून ट्वायलाइट पर्पलमध्ये लेदर-बॅक आवृत्ती येणार आहे. जागतिक टीझरमध्ये लेदर-बॅक आवृत्ती दाखवली गेली नाहीय.
5700mAh बॅटरीसह 50MP ट्रिपल कॅमेरा
अहवालांत फोनमध्ये 8.12-इंचाचा फ्लॅट फोल्डेबल स्क्रीन असेल, ज्यामध्ये पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा, कलरओएस 15, कस्टमाइज्ड सी पोर्ट आणि 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्टसह सुमारे 5700mAh बॅटरीसह 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. फाइंड एन2 सिंगापूरमध्ये प्री-ऑर्डरसाठी आधीच उपलब्ध आहे आणि प्री-ऑर्डर करणाऱ्यांना OPPO पेन मिळेल, असं कंपनीनं म्हटलं आहे.
कुठं पाहणार लाईव्ह
OPPO Find N5 चा जागतील लॉंच इव्हेंट तुम्ही घरबसल्या पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर (https://www.youtube.com/live/bqcR0xMhZT0) जाव लागणार आहे.
हे वाचलंत का :