रूबिना दीलेकने उचलली बिग बॉस १४ ची ट्रॉफी! - बिग बॉस ची अंतिम फेरी काल पार पडली
🎬 Watch Now: Feature Video
भारतीय रियालिटी शोजमध्ये अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या बिग बॉसची अंतिम फेरी काल पार पडली. गेले २० आठवडे अनेक भिन्न प्रवृत्तीच्या सेलिब्रिटीज एकाच घरात , बाहेरच्या जगाशी संपर्क तोडून, राहत होत्या. प्रेक्षकांचं प्रेम आणि सर्वात जास्त मतं मिळवून रूबिना दिलेक बिग बॉस १४ ची विजेती घोषित झाली.स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात रूबिना आणि राहुल वैद्य याच्यात विजेतेपदासाठी चुरस होती. शोचा होस्ट सलमान खान ने नेहमीच्या मस्तीत, टेन्शन वाढवत विजेत्यांची घोषणा केली आणि एकच जल्लोष झाला.