मुंबई - अभिनेता अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या यशामुळे सध्या चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. दरम्यान आता अल्लू अर्जुनची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. त्याच्या पोस्टमध्ये त्यानं चाहत्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भाषा वापरू नये अशी विनंती केली आहे. रविवारी 22 डिसेंबर रोजी इंस्टाग्रामवर त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
अल्लू अर्जुनची पोस्ट ? : साऊथ स्टार अल्लू अर्जुननं पोस्टमध्ये लिहिलं, "मी माझ्या सर्व चाहत्यांना त्यांच्या भावना नेहमीप्रमाणे जबाबदारीनं व्यक्त करण्याचे आवाहन करत असून ऑनलाईन आणि ऑफलाईन कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भाषा किंवा वर्तन करू नये यांची विनंती करतो." यानंतर त्याच्या पोस्टवर अनेक यूजर्सनं आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, 'आम्ही तुमच्याबरोबर आहे. अण्णा.' दुसऱ्या एकानं लिहिलं, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो, तुमचा कठीण काळ निघून जाईल.' आणखी दुसऱ्या एकानं लिहिलं, 'लव्ह यू पुष्पा.' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.
#WATCH | Hyderabad, Telangana: On December 4th Sandhya Theatre incident, Actor Allu Arjun says, " ...it is an unfortunate incident and frankly speaking, it is nobody's fault. i am actually very grateful to the government because they have given a lot of support to the film… pic.twitter.com/8a5jW2ty77
— ANI (@ANI) December 21, 2024
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केले आरोप : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी 4 डिसेंबर रोजी हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल विधान केलं होत. यात महिलेच्या मृत्यूप्रकरणी तेलंगणा विधानसभेत अल्लू अर्जुनवर अनेक गंभीर आरोप केले गेले होते. पोलिसांची परवानगी नसतानाही अल्लू अर्जुन 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2' पाहण्यासाठी गेला होता, हा आरोप मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला होता. यानंतर अल्लू अर्जुननं शनिवारी संध्याकाळी त्यांच्या ज्युबली हिल्स येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी अर्जुननं विधानसभेत लावण्यात आलेले सर्व आरोप नाकारले. याशिवाय तो पत्रकार परिषदच्या वेळी भावूक झाल्याचा देखील दिसला होता. तसेच अल्लू अर्जुननं चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या रेवतीच्या कुटुंबाची आणि तिचा जखमी मुलगा श्रीतेज यांची माफी मागितली. दरम्यान तेलंगणा विधानसभेत रेवंत रेड्डी आणि अकबरुद्दीन ओवेसी यांनी नुकत्याच केलेल्या विधानांवर स्पष्टीकरण दिलंय.
परिस्थिती समजून घेणे आवश्यक : तसेच याप्रकरणी डीजीपी जितेंद्र यांनी म्हटलं, "वैयक्तिकरित्या आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोपरि आहे. तो चित्रपटामधील अभिनेता असू शकतो, पण त्याला मैदानावरील परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. अशा घटना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चांगल्या नाहीत. सार्वजनिक सुरक्षेपेक्षा चित्रपटाचे प्रमोशन महत्त्वाचे नाही. महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार पुढे आहे. सार्वजनिक सुरक्षेसाठी आम्ही 24 तास काम करत आहोत. सर्वोच्च न्यायालयानेही या यंत्रणेचं कौतुक केलंय. आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ट्रस्ट सेंटर सुरू करण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे महिला आणि मुलांची सुरक्षा वाढेल. महिला कोणत्याही समस्येसाठी ट्रस्ट सेंटरमध्ये येऊ शकतात. येथे एक कायदेतज्ज्ञ आणि डॉक्टरही असणार आहे. जिथे कोणतीही समस्या सोडवली जाईल."
'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : 5 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित झालेला 'पुष्पा 2' चित्रपट 17 दिवसांनंतर बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. हा चित्रपट अजूनही बॉक्स प्रचंड कमाई करत आहे. या चित्रपटानं नुकतेच 'बाहुबली 2' चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.
हेही वाचा :