मेष : हा आठवडा आपल्यासाठी उन्नतीदायक आणि लाभदायक असू शकतो. आपल्या कार्यात यशस्वी होण्यासाठी आपणास मोठ्या अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. परंतु आपल्या प्रतिबद्धतेने त्यात आपण यशस्वी होऊ शकता. आपणास धीर धरावा लागेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या स्थितीचा अंदाज घ्यावयास हवा. असमंजस स्थितीत आपण घाई करू नये. ह्या उलट हळू-हळू आणि सामंजस्याने त्यात पुढील वाटचाल करावी. हा आठवडा प्रकृतीस सामान्यच आहे. मात्र, आपणास आपल्या आहार-विहारावर लक्ष ठेवावं लागेल. आपली प्रकृती ठणठणीत ठेवण्यासाठी आपण एखाद्या नवीन तंत्राचा किंवा उपायांचा वापर करू शकता, जे आपणास जास्त लाभदायी होऊ शकेल. आपले प्रेमसंबंध दृढ होतील. आपलं मन प्रसन्न राहील. कुटुंबियांची मदत आपणास समर्थन प्रदान करेल. कार्यक्षेत्री काही काळासाठी थोडा संघर्ष होऊ शकतो, परंतु त्यानंतर आपले कार्य संपन्न होण्याची संभावना आहे.
वृषभ : ह्या आठवड्यात आपणास विविध आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आपणास धैर्य आणि चोख व्यवहार करण्याची आवश्यकता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. संवाद साधताना सतर्क राहा. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची संभावना असल्यानं आपल्या संपत्तीत वाढ होईल. व्यवसायात सुद्धा संघर्षानंतरच लाभ प्राप्त होऊ शकतो. आपणास नवीन गुंतवणूक करण्याची किंवा व्यावसायिक संबंध जोडण्याची संधी मिळू शकते. परीक्षा आणि स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळण्याची शकता आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अध्ययनाकडं विशेष लक्ष देऊन अभ्यास करावा. प्रणयी जीवनात मागील काही दिवसांपासून आलेली कटुता दूर करण्याचा प्रयत्न करून प्रेमसंबंध दृढ करावे. आपल्या वैवाहिक जोडीदारासह दूरवरचा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळं आपल्या नात्यात गोडवा येईल. आईच्या प्रकृतीने चिंतीत होण्याऐवजी तिच्यावर प्रेम करा आणि तिचे समर्थन करा. ह्या आठवड्यात मुलांना एखादे मोठे यश मिळण्याची शकता आहे. त्यामुळं आपल्या मान-सन्मानात वाढ होईल.
मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी काही अडचणी आणि आव्हाने घेऊन येत आहे. कार्यक्षेत्री थकवा आणि कामाचा भार असल्याचं जाणवू लागल्यानं मन बेचैन होऊन काम करण्यास त्रास होऊ शकतो. आपलं लक्ष गाठण्यास त्रास होऊ शकतो. आर्थिक समस्यांचं निराकरण आठवड्याच्या सुरूवातीस करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. जमीन, घर किंवा वाहन ह्यांच्या खरेदी-विक्री करण्यास थोडा विलंब होऊ शकतो. आहारावर लक्ष द्या. पोटाचे विकार संभवत असल्यानं पौष्टिक आहार घेण्याची आणि व्यायाम करण्याची गरज आहे. प्रणयी जीवनात वाद संभवतात. अशा प्रसंगी प्रेमिकेस एखादी भेटवस्तू देऊन खुश करू शकाल. वैवाहिक जीवनातील सामंजस्य आणि प्रेम टिकून राहील. मुलांप्रती सुद्धा सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या आठवड्यातील आव्हानांना सामोरे जाताना डोके शांत ठेवण्याची आणि समस्यांचं निराकरण करताना सक्रिय राहण्याची गरज आहे.
कर्क : ह्या आठवड्यात आपणास विशेष लक्ष द्यावं लागेल. आपल्या कामात विघ्न आणणाऱ्या व्यक्तींपासून आपणास अंतर ठेवावं लागेल, जेणेकरून कार्यक्षेत्री आपली कामे निर्विघ्नपणे पार पडू शकतील. ह्या आठवड्यात कामानिमित्त प्रवासाचे आयोजन संभवते. तेव्हा त्यासाठी सुद्धा सावध राहावं. प्रणयी जीवनात सावध राहून मार्गक्रमण करावे. कोणत्याही प्रकारे गैरसमज होऊन समाजात बदनामी होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. त्यांच्याशी सामंजस्य निर्माण करून आपल्या कार्यक्षेत्री होत असलेल्या त्रासांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. घर-जमीन ह्यांच्याशी संबंधित वाद जर कोर्टाच्या बाहेर सोडवायची संभावना असली तर आपणास अनुकूल न्याय मिळू शकेल ह्याकडं लक्ष द्यावं. ह्या आठवड्यात संघर्ष करून आणि सावधपणे पाऊल उचलून आपण आपलं लक्ष गाठण्यात यशस्वी होऊ शकाल.
सिंह : हा आठवडा आपल्यासाठी सौभाग्य घेऊन येत आहे. युवकांची संगीत, कला, नृत्य इत्यादीतील गोडी वाढेल. ह्या आठवड्यात आपण बराचसा वेळ मित्रांसह मौज-मजा करण्यात घालवाल. जमीन, घर किंवा वाहन इत्यादींच्या खरेदी-विक्रीची मनोकामना पूर्ण होऊ शकेल. आई- वडीलांकडून सहकार्य प्राप्त होईल. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. आपल्या प्रेम संबंधांचे रूपांतर विवाहात होऊ शकते. आपले कुटुंबीय आपल्या प्रेम संबंधाचा स्वीकार करतील. आपले दांपत्य जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह आपण एखाद्या सहलीच्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. परीक्षा- स्पर्धेची तयारी करणाऱ्यांसाठी हा आठवडा भाग्यशाली ठरेल. आपणास एखादी चांगली बातमी ऐकिवात येण्याची संभावना आहे. आपणास मुलांचं सहकार्य प्राप्त होईल.
कन्या : हा आठवडा आपल्यासाठी काहीसा धावपळीचा आहे. आठवड्याच्या सुरूवातीस कामानिमित्त जवळचे किंवा लांबचे प्रवास करावे लागू शकतात. आर्थिक बाबतीत योजनाबद्ध कार्य करणे लाभदायी होईल. विद्यार्थाना अभ्यासाचा कंटाळा येण्याची संभावना असल्यानं त्यांना त्याकडं लक्ष देण्याची गरज आहे. प्रेमसंबंधात स्वतःशी आणि प्रेमिकेशी प्रामाणिक राहिल्यास प्रणयी जीवन सुखद होईल. एकाचवेळी दोन जणींशी संबंध ठेवण्याच्या प्रयत्नात आपणास मोठ्या संकटास सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवनात प्रेमळ वाद झाले तरी दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. आहाराकडं विशेष लक्ष द्यावं लागेल, अन्यथा पोटाचे विकार होण्याची संभावना आहे. व्यापारात अपेक्षित लाभ न झाल्यानं मन हताश होऊ शकते. परंतु सकारात्मक चिंतन करूनच प्रगती होत असते ह्याची जाणीव आपणास ठेवावी लागेल. ह्या आठवड्यात सतर्क राहून समस्यांचा सामना केल्यास आपण यशस्वी व्हाल.
तूळ : हा आठवडा आपल्यासाठी काही समस्या घेऊन येऊ शकतो. परंतु धैर्य आणि समर्थनासह आपण त्यांचा सामना करू शकाल. कामात थोडा त्रास होऊ शकतो, परंतु तो दीर्घकाळ होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. धीर धरून आणि कुटुंबियांच्या सहकार्याने आपण त्यातून बाहेर पडावे. आठवड्याच्या मध्यापर्यंत गोष्टी आपल्या बाजूनं परावर्तित होण्याचे संकेत आहेत. त्यात आपणास समर्थन आणि मदत मिळू लागेल. धीर धरा आणि मोठा निर्णय घेण्यासाठी कुटुंबियांशी चर्चा करून सहमती मिळवा. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या धार्मिक ठिकाणचा प्रवास होण्याची संभावना आहे. हा प्रवास आपल्या आत्म्यास शांती आणि सकारात्मकता प्रदान करू शकेल. प्रेम संबंधातील प्रगल्भता आणि प्रेमिकेशी उत्तम समन्वय, ह्या दोन कारणाने आपले प्रेमसंबंध दृढ होऊन आपण आनंदित व्हाल. व्यापारात आपण यशस्वी व्हाल. तसेच व्यापारवृद्धी करण्यात सुद्धा आपण यशस्वी व्हाल.
वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी होणार आहे. ह्या आठवड्यात परीक्षेची-स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावं लागतील, जे त्यांना शेवटी यशस्वी करतीलच. आपणास गुप्त शत्रूंपासून सावध राहावं लागेल. तेव्हा सतर्क राहा. कार्यक्षेत्री आपल्या योजनेची माहिती कोणालाही न देण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. जर हि माहिती आपल्या विरोधकांच्या हाती लागली तर ते आपले नुकसान करण्याची संभावना आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसायानिमित्त प्रवास करावे लागतील. ह्या आठवड्यात आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहावं लागेल. प्रणयी जीवनात प्रेमळ वाद संभवतात. वैवाहिक जीवन सुखद होईल. ह्या आठवड्यात आपल्या वैवाहिक जोडीदाराशी संबंधातील माधुर्य टिकून राहील. जोडीदार आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील. ह्या आठवड्यात आपली कामे सावधपणे संपन्न करा. जवाबदारी लक्षपूर्वक पार पाडा. हा आठवडा आपणास अनुकूलता प्रदान करणारा आहे. आपण विभिन्न क्षेत्रात यशस्वी व्हाल. आपले पाऊल समृद्धीच्या दिशेने पडेल. आपल्या उद्योग-व्यवसायाची वृद्धी होईल. प्रणयी जीवनास सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे.
धनु : हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी होऊ शकतो. आपला प्रवास सुखद होईल. आपणास आपल्या कुटुंबियांसह सहलीस जाण्याची संधी मिळेल. कारकिर्दी आणि व्यवसायाच्या दृष्टीनं सुद्धा आठवडा आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. आठवड्याच्या सुरूवातीस आपणास अपेक्षित पद मिळू शकते. तसेच एखाद्या उपलब्धीसाठी आपणास सन्मानित सुद्धा केलं जाऊ शकतं. त्यामुळं आपली प्रतिष्ठा उंचावेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास मुलांकडून खुशखबर ऐकण्याची संधी मिळू शकते. स्वकीयांशी झालेले गैरसमज दूर होऊन आत्मीय प्रेमात वाढ होईल. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी सुद्धा शुभ फलदायी आहे. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात कुटुंबीय आपल्या प्रेम विवाहावर शिक्कामोर्तब करू शकतात. आपलं दांपत्य जीवन सुखद होईल. हा आठवडा आनंददायी होण्याची संभावना आहे. आपणास आपल्या प्रियजनांच्या सहवासात आनंददायी आणि सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. आपण आपल्या जीवनात अनेक चांगल्या बातम्या ऐकू शकाल.
मकर : ह्या आठवड्यात आपणास आपल्या ध्येयावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. समस्यांचं शांत मनानं निराकरण करण्यासाठी आपणास धैर्याने आणि संयमानं कामे करावी लागतील. आपण जर आपल्या प्रेमसंबंधांचे प्रदर्शन सामाजिक माध्यमांवर नाही केलं तर आपणास निष्कारण त्रासापासून दूर राहण्यास मदत होईल. व्यावसायिक दृष्टिकोनातून आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञ व्यक्तीचा किंवा हितचिंतकांचा सल्ला घेणं उचित ठरेल. ह्या आठवड्यात वैवाहिक जीवन सुखद होणार असले तरी पत्नीशी समन्वय साधणे काहीसं अवघड होऊ शकतं. असं असून सुद्धा आपणास आपल्या जोडीदाराचे समर्थन मिळत राहील. परदेशात जाऊन स्थायी होण्याची किंवा रोजगारासाठी प्रयत्न करण्याची योजना असल्यास आपणास थोडी वाट पाहावी लागू शकते. परंतु आपले प्रयत्न यशस्वी होतील. ह्या आठवड्यात आपले संबंध जपण्यावर आणि आपल्या ध्येयावर विशेष लक्ष दिल्यास आपणास चांगले परिणाम मिळतील.
कुंभ : हा आठवडा आपल्या व्यवसायासाठी आणि कारकिर्दीसाठी शुभ आणि लाभदायी आहे. आपल्या व्यावसायिक क्षेत्रात केलेले प्रवास सुखद आणि फलदायी होईल. आपणास वरिष्ठांचे आणि कनिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ह्या दरम्यान आपणास जीवनात प्रगती करण्याची चांगली संधी मिळू शकते. आपल्या प्राप्तीसाठी अतिरिक्त स्रोत मिळू शकतात. आठवड्याच्या मध्यास एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची झालेली भेट भविष्यात मोठ्या लाभास कारणीभूत होऊ शकते. जमीन-घर ह्यांच्या खरेदी-विक्रीसाठी आई-वडिलांचं सहकार्य लाभेल. त्यामुळं आर्थिकदृष्ट्या आपण स्थिर होऊ शकाल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा शुभ फलदायी आहे. प्रेमिकेसमोर आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्यास कुटुंबीयांची संमती मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल. आपण जर स्पर्धेची तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. आपली मेहनत आणि अध्ययन ह्यावर लक्ष केंद्रित करावं. आपणास यशस्वी होण्याची संधी आहे. एकंदरीत हा आठवडा आपणास यश, समृद्धी, प्रेम, आरोग्यासाठी लाभदायी आहे. आपल्या प्रकृतीकडं लक्ष देत असतानाच कारकिर्दीत व व्यवसायात सुद्धा यश प्राप्ती होईल. प्रेमसंबंधात सुद्धा सुखद विकास होईल. आपल्या मेहनतीने आणि समर्थनाने आपण आपले लक्ष्य गाठू शकाल.
मीन : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी असून तो यश आणि आनंद घेऊन येणारा आहे. आपणास जीवनात नवीन आणि सुखद संधी मिळणार आहे. आपणास त्याचा लाभ घ्यावयाचा आहे. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना सुद्धा चांगली संधी मिळू शकते. आपण जर परदेशात उच्च शिक्षणासाठी किंवा कामासाठी जाण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा आपणास त्यात यश मिळवून देईल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. ऋतुजन्य विकार होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. आपण प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षणांचा आनंद घेऊ शकाल. वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात जमीन-घर किंवा वडील्याच्या संपत्तीशी संबंधित विवादांचे निराकरण होईल. ह्यात आपण विजयी व्हाल. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळून प्रगती होईल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात आपली प्रगती होईल. एकंदरीत हा आठवडा आपल्यासाठी यशाचा, सुखाचा आणि प्रगतीचा आहे. आपणास आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्या बरोबरच आपल्या प्रकृतीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल.
हेही वाचा -
यंदा मकर संक्रांत कधी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि काळ्या रंगाचं महत्त्व