Rakhi Samvat's reaction :पाहा, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राखी सांवतची उत्स्फुर्त प्रतिक्रिया - Prime Minister Narendra Modi

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 20, 2021, 10:11 PM IST

Updated : Nov 20, 2021, 10:22 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) कृषीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा (Announcement of repeal of agricultural laws) केली. मोदी सरकारने गेल्या वर्षी कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी तीन कायदे आणले होते, ज्याला अनेक शेतकरी संघटना सातत्याने विरोध करत होत्या.पीएम मोदींच्या या घोषणेनंतर बॉलिवूड कलाकारांनी यावर अनेक ट्वीट केले. अशामध्ये जेव्हा राखी सावंतला (Rakhi Sawant) याबाबत विचारण्यात आले, तेव्हा तिनेही यावर आपले मत मांडले. (Rakhi Sawant's outburst after the repeal of agricultural laws) आपल्या सेन्स ऑफ ह्युमरने सर्वांना हसवणारी राखी असे काही बोलली, ज्यानंतर नेटकरी तिची प्रशंसा करत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राखी कृषी कायदा मागे घेण्याच्या मोदींच्या घोषणेवर वक्तव्य करताना दिसत आहे. राखीला जेव्हा विचारण्यात आले की, मोदीजींनी शेतकरी कायदा मागे घेतला आहे, यावर तुमचे काय म्हणणे आहे? ज्यावर राखी म्हणते, "अभिनंदन. चला, आता सर्व शेतकरी सुखी होतील आणि हे आंदोलन सीमेवर होत होते, त्यांनी हँडल दुरुस्त केले होते. मला खूप आनंद आहे की, मोदीजींनी योग्य निर्णय घेतला आहे. हा फार पूर्वी घेतला असता, तर अनेक शेतकर्‍यांना जीव गमवावा लागला नसता. त्यांना उपोषणही करावे लागत नाही. पण मोदीजी तुमचा निर्णय खूप चांगला आहे. जय जवान जय किसान.राखीच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Last Updated : Nov 20, 2021, 10:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.