नाना पाटेकरांनी चालवला नांगर, शेतकरी आणि जवांनांचा वाढवला उत्साह - नाना पाटेकरांनी जवांनांचा वाढवला उत्साह
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-7872965-417-7872965-1593762610407.jpg)
पाटणा - प्रसिध्द अभिनेता नाना पाटकर यांनी बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील मोकामा सीआरपीएफ कॅम्पला भेट दिली. नाना कॅम्पमध्ये पोहोचताच जवानांच्यामध्ये उत्साह संचारला होता. त्यांनी जवानांची विचारपूस केली आणि उर्जा वाढवली. यासोबतच नाना यांनी शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. शेतात पेरणीचा नजाराही पाहिला. यावेळी नाना यांनी परंपरागत बैलाचा नांगर धरुन शेतकामही केले. नाना यांना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. नानाने सर्वांना अभिवादन करुन निरोप घेतला.