''मुलींनो स्वतःवर विश्वास ठेवा'', मिस युनिव्हर्स हरनाझचा सल्ला - Former Miss Universe Lara Dutta
🎬 Watch Now: Feature Video
मिस युनिव्हर्स हरनाझ संधू अभिनेत्री आहे. त्यामुळे या क्षेत्रात तिला करियर करायचे आहे. लवकरच तिच्या बॉलिवूड पदार्पणाची बातमी आपल्याला ऐकायला मिळू शकेल. जगभरातील मुलींना तिने स्वतःवर विश्वास ठेवा असा सल्ला दिला होता. याबद्दल ती म्हणाली, ''जगभरातील सर्वांना माझा हा सल्ला आहे. जेव्हा तुमचा उत्साह जास्त असतो, तेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. जर तुमचा विचार आणि हेतू खरा असेल तर तुमच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही. मी पंजाबी वाघीनीसारखी वावरली असून नेहमी चौकटीबाहेरचा विचार केला आहे. संयम आणि मेहतीने काम करा. यश तुमचेच आहे. अपयशाने खचून जाऊ नका, त्यातून काही शिका, असा सल्लाही तिने तरुणींना दिला.''
Last Updated : Dec 25, 2021, 10:45 PM IST