Shivsena Vs Somaiya : किरीट सोमैयांच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेनेचे नागपूरात आंदोलन - किरीट सोमैया शिवसेना नागपूर
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - किरीट सोमैयांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. या मागणीसाठी नागपुरात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नागपूरच्या संविधान चौकात शिवसैनिकांनी किरीट सोमैया आणि भाजपा विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली गोळा केलेला कोट्यवधींचा निधी योग्य ठिकाणी जमा न केल्याचा आरोप किरीट सोमैयांवर होत आहेत. किरीट सोमैयांची ही कृती देशद्रोहाची असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी शिवसैनिकांनी यावेळी ( Shivsena Protest Against Kirit Somaiya ) केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST