Shivsena Protest Yeola : येवल्यात शिवसेनेतर्फे किरीट सोमय्यांच्या फोटोला जोडे मारून पायाखाली तुडवले.. - आयएनएस विक्रांत निधी भ्रष्टाचार प्रकरण
🎬 Watch Now: Feature Video

येवला ( नाशिक ) : भाजपचे नेते किरीट सोमय्या ( BJP Leader Kirit Somaiya ) यांच्या विरोधात येवल्यातील शिवसेना आक्रमक झाले ( Shivsena Protest Yeola ) आहेत. आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी जमा केलेला निधी ( INS Vikrant Fund Fraud Case ) सोमय्यांनी हडप केल्याचा शिवसेनेने आरोप केला आहे. तहसील कार्यालय येथे किरीट सोमय्या यांच्या फोटोला 'जोडे मारो आंदोलन' करत फोटो पायाखाली तुडवण्यात आला. किरीट सोमय्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. किरीट सोमय्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक ( Shivsainik Demands To Arrest Kirit Somaiya ) करण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली होती. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, युवा नेते कुणाल दराडे, रतन बोरणारे, राजेंद्र लोणारी, झुंजारराव देशमुख, राहुल लोणारीसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST