Badlamshah Urus हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बदलमशहा ऊरुस यात्रा, पहा व्हिडिओ

By

Published : Oct 30, 2022, 9:27 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

thumbnail
बीड गेवराईत हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेल्या हजरत किबला सय्यदशहा बदलमशहा दर्गाह सुशी येथे ऊरुसनिमित्त बुधवार दि. २६ ऑक्टोबर रोजी गावातून संदल छबीना मिरवणूक. तर गुरुवार दि. २७ व शुक्रवार दि. २८ रोजी दोन दिवसीय यात्रा उत्साहात संपन्न Yatra on occasion of Badlamshah Urus झाली. यात्रेकरूंनी यात्रेसाठी मोठी गर्दी केली होती. आगळा-वेगळा उत्सव म्हणजे उरुस व यात्रोत्सव होय. दिवाळीची अमावस्या होवून जो बुधवार येतो. त्यादिवशी गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव येथे संदल मिरवणूक होऊन यात्रेला प्रारंभ झाला. बुधवार दि.२६ ऑक्टोबर रोजी हजरत किबला सय्यदशहा बदलमशहा रहेमतुल्लाह अलईह यांच्या उरूसनिमित्त गावातुन हिंदू-मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संदल मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणूकीत सर्व गांवकरी तसेच वडगांव चिखली सिंदखेड कवडगांव बंगालीपिंपळा कोळगाव मादळमोहीसह अन्य ठिकाणाहूनही लोक मोठ्या संख्येने सहभागी होते. तर गुरुवार हा यात्रेचा दुसरा दिवस. म्हणजे बच्चे कंपनीचा मौजमजा करण्याचा दिवस Badlamshah Urus At Sushi in Gevarai In Beed असतो. या ठिकाणी गेवराई मादळमोही सिरसदेवी गढी उमापूर सिरसमार्ग येथील कापड दुकानदार हाॅटेलचालक व खेळण्याचे व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने थाटली होती. उरुसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणूक व यात्रोत्सवात यात्रेकरूसह परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित Yatra on occasion of Badlamshah Urus In Beed होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.