सत्ताधीशांना हिंसाचार घडवायचाय, आरक्षणाबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी - यशोमती ठाकूर
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती Yashomati Thakur : सध्या केंद्रात आणि राज्यात ज्यांची सत्ता आहे, त्या सत्ताधीशांना हिंसाचार हवा आहे. त्यांना हिंसाचार करायचा असतो. एका समाजाला दुसऱ्या समाजाशी मिळवायचं हाच सत्ताधीशांचा उद्देश आहे. त्यामुळंच वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी डिसेंबर अखेरीस देशात हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य केलं असल्याचं काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakurs On Prakash Ambedkar) यांनी म्हटलं आहे.
आरक्षणासंदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट करावी : सध्या आरक्षणावरून राज्यात आंदोलन सुरू आहेत. राज्य सरकारने मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. खरोखर एखाद्या समाजाला आरक्षण देणं शक्य आहे का किंवा नाही, याबाबत सरकारने स्पष्टपणे सांगायला हवं, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. संविधान दिनानिमित्त अमरावती शहरातील हिरवी चौक येथे यशोमती ठाकूर यांनी आदरांजली वाहिली. यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुनील देशमुख, दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत आदी उपस्थित होते.