राज्यात प्रकल्प आले की त्याला विरोध करणे आणि नंतर ओरडणे हेच महाविकास आघाडीचे काम - रावसाहेब दानवे - केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
🎬 Watch Now: Feature Video

आदित्य ठाकरे यांच्या ट्विटला केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज उत्तर देताना सांगितले की, राज्यात प्रकल्प आले त्याला विरोध करणे आणि बाहेर प्रकल्प गेले की त्या प्रकल्पाच्या नावाने ओरडणे हा महाविकास आघाडीचा धंदा आहे. बारसु प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत भाजप आणि शिंदे सरकारवर टीका केली.या ट्विटला केंद्रीय दानवे यांनी उत्तर दिले.कोणताही प्रकल्प राज्यात आला की त्याला विरोध करायचा आणि बाहेर गेला की त्या प्रकल्पाच्या नावाने ओरडायचे हाच महाविकास आघाडीचा धंदा असल्याचे दानवे यांनी म्हटले. केंद्र सरकारच्या उपक्रमातून जालन्यात 'वन रोड वन ट्री' याेजना राबवण्यात येत आहे. तीचे उद्घाटन दानवे त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पून्हा जरी होणार असली तरी सभेनंतर पुन्हा काय होतं याची वाट पाहा असा ईशारही त्यांनी दिला आहे.