Mumbai Rain Update: पाहा, मुंबईमध्ये अवकाळी पाऊस, ठिकठिकाणी साचले पाणी - जोरदार पाऊस

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 21, 2023, 9:58 AM IST

मुंबई : मुंबईमध्ये आज सकाळी पुन्हा एकदा वातावरण बदलले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण आकाश काळ्या ढगांनी व्यापले होते. रिमझिम पाऊस पडत होता. पहाटे 5 नंतर पाऊस सुरू झाला होता. हा व्हिडिओ वडाळा, दादर, किंग सर्कल, वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर इट येथील आहे. इतर भागात जोरदार पाऊस झाला. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाने दस्तक दिली आहे. अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली दहिसर या सर्वच भागात पाऊस पडत आहे. दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.