विधानसभा 'अशी' बरखास्त करता येते, अशी लागू शकते राष्ट्रपती राजवट - उल्हास बापट - Presidential reign

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 22, 2022, 1:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

पुणे - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी दिलेत. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने,” असे राऊतांनी ट्विटरवरुन म्हटले. विधान सभा कशी बरखास्त होते यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट ( Ulhas Bapat ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्यपालांकडे आहे. मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करू शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला तर राज्यपाल हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारतील त्यांनी जर नाही म्हटले तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. ही राष्ट्रपती राजवट ही 6 महिने असते आणि त्यानंतर राज्यात निवडणुका लागू शकते, असे यावेळी उल्हास बापट म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.