Trupti Desai on Bageshwer Baba : साईबाबांना देव म्हणायचे नाही, तर धीरेंद्र शास्त्रीला जोकर म्हणायचे का? तृप्ती देसाईंची गुन्हा दाखल करण्याची मागणी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा हे देव नसून, त्यांना देव म्हणू नका .असे वक्तव्य बागेश्वर धामचे बाबा धिरेंद्र शास्त्री यांनी केली. आता त्यांच्यावर सर्वच टीका होत आहे. बागेश्वर बाबावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडचे अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केलेली आहे. जर साईबाबांना देव म्हणायचे नाही, तर मग धीरेंद्र शास्त्रीला जोकर म्हणायचे का ? असा प्रश्न सुद्धा तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे. साईबाबा हे देवच होते. तुमचा कुठला सनातन धर्म माहीत नाही. तुम्ही जोकरच आहात. मध्येच हसता मध्येच नाचता, मध्येच काहीतरी करता, परंतु आमची हिंदू संस्कृती आम्हाला तुम्हाला जोकर म्हणायची परवानगी देत नाही आम्ही म्हणणारी नाही. तुमची निंदा करणार नाही. परंतु जर साईबाबांवर तुम्ही बोलणार असाल, तर त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्याची मागणीच आम्ही करत आहोत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत. बागेश्वरच्या धीरेंद्र शास्त्रीवर यापूर्वीसुद्धा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठोठांत बाबा असून प्रसिद्धीसाठी असले वाक्य करतो असे म्हटले आहे. अशा बाबांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली होती. तीच मागणी आता तृप्ती देसाई यांनी केली आहे. बागेश्वर बाबा यांनी यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रात येऊन तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर सुद्धा त्यांचा मुंबईत कार्यक्रम झाला होता. त्यामुळे बागेश्वर बाबा विरोधात कारवाई कधी होणार, सरकार कधी तत्परता दाखवणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण आता सर्वजण बागेश्वर बाबा विरोधात कारवाईची मागणी करत आहेत.