दिवाळी पहाट कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध, पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
पुणे पुण्यात दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात Diwali Pahat in Pune आले. त्रिदल पुणे आणि पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे १९९२ साली सुरु झालेल्या दीर्घ सांस्कृतीक पंरपरेला साजेशा 'दीपसूर तेजाळती' या केंद्रीय संकल्पनेवर आधारित दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात Tridal Pune and Punya Bhushan Foundation Organized आले. आज पहाटे साडे पाच वाजल्यापासून पुण्याचे बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते. या पहाट मैफलीमध्ये पद्मश्री विजय घाटे यांचे तबला वादन, विदुषी मंजुषा पाटील यांचे गायन, पंडित प्रविण गोटखिंडी यांचे बासरी वादन, सुश्री शीतल कोलवालकर यांचे कथ्थक, तन्मय देवचके यांचे हार्मोनियम वादन, शिखर नाद कुरेशी यांचे ड्रम्स वादन, अतुल रानिंगा यांचे किबोर्ड वादन आणि ओंकार दळवी यांचे पखवाज वादन झाले. पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नृत्यांगनांचा मान्यवरांच्या हस्ते कृतज्ञता सत्कार करण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST