Shri Poddareshwar Ram Temple: फडणवीसांनी ओढला प्रभु रामचंद्रांचा रथ, पहा पोद्दारेश्वर राम मंदिरातील भव्य शोभायात्रेतून सर्वधर्मसमभावाचा संदेश
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : नागपूरमध्ये ३ वर्षानंतर ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरातुन प्रभू रामाची भव्य-दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. पोद्दारेश्वर राम मंदिराचे हे शंभरावे वर्षे होते. त्यामुळे विशेष तयारी करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, खासदार कृपाल तुमाने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह शहरातील आमदार आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी प्रभू श्रीरामाचा रथ ओढायचा सुरुवात केली. त्यानंतर ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा सुरू झाली. ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर हे नागपुरच्या मुख्य रेल्वे स्थानकाच्या शेजारी आहे. नागपूरामधून संपूर्ण जगाला सर्वधर्मसमभावचा महत्वपूर्ण संदेश दिला जातो. या कारणांमुळे शोभायात्रेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.