Sipana River Flooded Due to Torrential Rains: मेळघाटात सिपना नदीला पूर; युवक नदीत वाहून गेल्याने खळबळ - अनेक गावांचा संपर्क तुटला

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 10, 2022, 12:28 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

जिल्ह्यातील मेळघाटातून वाहणाऱ्या सिपणा नदीला मुसळधार पावसामुळे पूर ( Flooded due to Torrential Rains ) आला आहे. या पुरात धारणी तालुक्यातील दिया या गावातील ( Dia village in Dharani taluka ) एक युवक रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास वाहून गेल्यामुळे ( swept away in River ) खळबळ उडाली आहे. कृष्णा कासदेकर (वय 35) असे नदीत वाहून गेलेल्या युवकाचे नाव ( Krishna Kasdekar swept away in River ) आहे. पाण्याच्या प्रवाहात शोध घेणे कठीण जात आहे. सिपना नदीच्या पुराचा प्रवाह अतिशय प्रचंड असल्यामुळे या प्रवाहात नदीत वाहून गेलेल्या कृष्णा कासदेकर या युवकाचा शोध घेणे अतिशय कठीण असले तरी बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तिवसासह मेळघाटात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. मेळघाटात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मेळघाटातून वाहणाऱ्या सिपनासह इतर सर्वच नद्यांना पूर आला असल्यामुळे मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.