Shambhuraj Desai : आमच्या महानाट्याचे अवघ्या देशाने कौतुक केले - मंत्री शंभुराज देसाई - Shambhuraj Desai attacks
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : सामनामध्ये आलेल्या अग्रलेखाबाबत मंत्री शंभूराज देसाई ( Minister Shambhuraj Desai) यांना विचारले असता ते म्हणाले की ज्यांना आत्ता काहीही काम नाही तसेच सामनाचा अग्रलेख या आधी दर्जेदार स्वरूपाचा असायचा. पण गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून फक्त आणि फक्त आमच्यावर टीका याशिवाय दुसर काहीही दिसत नाही. आम्ही जे महानाट्य केले ते यशस्वी केले आणि ते राज्याने नव्हे तर देशाने त्याची कौतुक केली आहे. पण या महानाट्यामुळे ते दुखावले आहेत. ज्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे, तेच आमच्यावर टीका करत आहे. मंत्री शंभुराजे देसाई यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे दर्शन घेतले. हर हर महादेव चित्रपटाविषयी त्यांनी म्हटलंय की, हजारो इतिहासकारांना माहीत आहे पण त्या परिवारातील जे वारस आहे ते छत्रपती संभाजीराजे यांनी देखील भूमिका मांडली आहे. की जे इतिहासात नाही ते या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावर मी निर्मात्यांना सांगेन की ज्या काही आक्षेपार्ह गोष्ट आहे. तसेच ज्याचा संदर्भ इतिहासात नाही ते दाखवू नये.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST