नागपूर : "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात लव जिहादची वास्तविकता दिसून आलेली आहे. महाराष्ट्र सारख्या राज्यात अशा स्वरूपाचं प्रकरण वाढत आहे. एखाद्या धर्माच्या व्यक्तीनं दुसऱ्या धर्मच्या व्यक्तीशी लग्न करण्यात काही गैर काही नाही. मात्र, खोटं बोलून, स्वतःची ओळख लपवून आणि फसवणूक करून आंतरधर्मीय लग्न करत मुलं जन्माला घालून तरुणीला सोडण्याची प्रवृत्ती सुरु आहे, ते योग्य नाही, यावर कारवाई करावी लागेल. त्यासाठीच लव्ह जिहाद विरोधी कायदा केला जाणार आहे. त्या साठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक केली आहे." अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज नागपूर येथे बोलत होते.
५० कोटीपेक्षा अधिक नागरिकांनी महाकुंभमध्ये केलं स्नान : "जे लोक महाकुंभला जाऊ शकले नाही, अशा लोकांसाठी तिथलं पवित्र गंगाजल नागपूरकर जनतेसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी valuable ग्रुप आणि सत्संग फाउंडेशनचे आभार मानले. मानवी संस्कृती आणि सभ्यतेत हजारो वर्षांपासून मानवी संगम कुंभमेळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळतो. सनातन संस्कृतीला मानणारे, विविध पूजा पद्धती होणारे, विविध पंथाची जोडलेले सर्व लोक धर्म पंथ विसरून महाकुंभमध्ये गंगेत स्नान करतात. 50 कोटी पेक्षा जास्त भारतीय गंगा स्नानासाठी प्रयागराजला जाऊन आले. 90 कोटी भारतीय असे आहेत ज्यांना महाकुंभला जाण्याचा योग आला नाही. अशाच लोकांसाठी valuable ग्रुपनं सत्संग फाउंडेशनसोबत मिळून हा उपक्रम राबविला आहे. इथं संगमाचं पाणी आपल्यावर पडतं आणि दुधात साखर असा योग म्हणजे संतांच्या पादुकांचे दर्शन आपल्याला मिळतं. या सर्व संतांनी आपल्या समाजाला एक चांगलं वळण दिलं, सुख दुःखात धीर दिला, आपल्याला भगवंतांचं दर्शन घडवणाऱ्या संतांच्या पादुकांचं दर्शन आपल्याला लाभत आहे." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा :