शाहरुख खान साई चरणी लीन, कन्या सुहानाही होती सोबत; पाहा व्हिडिओ - Suhana Khan
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 14, 2023, 8:06 PM IST
शिर्डी Shah Rukh Khan Visit : बॉलीवुडचा बादशाह किंग खान अर्थात शाहरुख खानने आज कन्या सुहानासोबत शिर्डीत साई समाधीचं दर्शन घेतलंय. चार्टर फ्लाइटने शाहरुख आपल्या टिमसोबत शिर्डी विमानतळावर पोहोचला. त्यानंतर कारने तो साई मंदिराच्या व्हिआयपी गेट समोर आला. या ठिकाणी साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर (P. Shiva Shankar) यांनी त्याचं स्वागत केलं. शाहरुख येणार असल्याची माहिती शिर्डीत वाऱ्यासारखी पसरल्याने, साईमंदिर परिसरात आलेल्या भाविकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात शाहरुख त्याची मुलगी सुहाना (Suhana Khan) आणि इतर टिमने द्वारकामाईत जाऊन दर्शन (Saibaba Samadhi Darshan) घेतलं. त्यानंतर साई समाधी समोर शाहरुख नतमस्तक झाला. यावेळी शाहरुख खानच्या हस्ते साईंच्या पादुकांची पूजा करण्यात आली. 'शिर्डी माझे पंढरपूर' ही छोटी आरतीही शाहरुखच्या हस्ते करण्यात आली. तर शाहरुख खानचा साई संस्थानच्या वतीनं साईंची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.