Video शशी थरूर पुन्हा एकदा पडले प्रेमात.. तिच्यासह पोहोचले थेट ताजमहाल पाहायला.. पहा व्हिडीओ - आगरा की ताजी खबर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 2, 2022, 7:26 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

आग्रा (उत्तरप्रदेश ): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आज पुन्हा एकदा प्रेमात पडले. होय हे खरं आहे. मात्र त्यांचे आजचे प्रेम हे कुना महिलेवर नसून, त्यांना आज प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालवर प्रेम झाले आहे. थरूर शुक्रवारी आई आणि बहिणीसह आग्रा किल्ल्यावर पोहोचले. त्यांनी अकबर महल, जहांगीर महल, दिवाण-ए-आम, दिवाण-ए-खास या भेटी दिल्या. याच्या एक दिवस आधी त्यांनी ताजमहालला भेट देऊन तेथील सौंदर्याची प्रशंसा केली Congress leader Shashi Tharoor saw the Taj Mahal होती. खासदार शशी थरूर गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या बहिणीसोबत त्यांची आई लिली थरूर यांचा ८७ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आग्रा येथे पोहोचले. शुक्रवारी ताजमहाल बंद असतो. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळीच ते कुटुंबासह ताजमहाल पाहण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी पर्यटक गाईडकडून ताजमहालचा इतिहास आणि मोझॅकची माहिती घेतली होती. शशी थरूर यांनी जेव्हा रॉयल गेटमधून ताजमहाल पाहिला तेव्हा ते टक लावून पाहत राहिले. यानंतर त्यांनी ताजच्या सौंदर्याचे कौतुक केले. काही पर्यटकांनी शशी थरूर यांच्यासोबत सेल्फी काढले. यासोबतच त्यांनी भरपूर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करून घेतली. यासोबतच शुक्रवारी थरूर आई आणि बहिणीसोबत आग्रा किल्ला पाहण्यासाठी गेले होते. येथे त्यांनी गडाच्या इतिहासाशी संबंधित माहिती घेतली. त्यासोबत त्याने सेल्फीही काढला. आग्रामध्ये असतानाही त्यांनी मीडियापासून अंतर ठेवले होते. Shashi Tharoor saw the Taj Mahal in Agra
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.