Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं वानखेडेवर अनावरण - सचिन तेंडुलकर
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 1, 2023, 11:03 PM IST
मुंबई Sachin Tendulkar : क्रिकेट जगतातील महान फलंदाज सचिन तेंडुलकरांच्या पुतळ्याचं अनावरण आज करण्यात आलं. सचिन तेंडुलकर वानखेडे मैदानावर पहिला सामना खेळला होता. त्याच मैदानावर सचिन तेंडुलकरचा पुतळा बसवण्यात आला आहे. भारत- श्रीलंका यांच्यातील विश्वचषक सामना 2 ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या हस्ते सचिन तेंडुलकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी सचिन तेंडुलकरसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. सचिन तेंडुलकरांचा पुतळा 22 फूट उंच आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी ही सचिन तेंडुलकारांची 22 फुटांची कलाकृती वानखेडे स्टेडियमवर साकारली आहे.