2000 Note Exchange : आजपासून 'नोटबदली' सुरू; फॉर्म भरून घेत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम - 2000 Note
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : देशभरात आजपासून २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईत सुद्धा अनेक ठिकाणी नोटा बदली करण्यासाठी बँकांमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे. नोटा बदलीसाठी ४ महिन्यांचा अवधी असल्याने त्या बदलण्यासाठी नागरिकांनी बँकांत गर्दी करून नये, असे आव्हान रिजर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी केले आहे. तरीसुद्धा या नोटा लवकरात लवकर बदली करून घेण्यासाठी नागरिकांनी बँके कडे धाव घेतली आहे. २ हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी कोणतेही ओळखपत्र लागणार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले असले तरीसुद्धा, बँकेमध्ये नोट बदलीसाठी फॉर्म भरून घेत असल्याकारणाने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या फॉर्मवर नागरिकाचे, खातेधारकाचे नाव, त्याचे ओळखपत्र, त्याचबरोबर आधार कार्ड क्रमांक हे लिहिणे अत्यावश्यक असल्याने, नागरिक याबाबत बँकांकडे विचारणा करत आहेत. दक्षिण मुंबईतील एचडीएफसी बँकेच्या बाहेरून याचाच आढावा घेतला आहे.