Video कार पार्किंगवरून वाद, पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची हत्या - दिल्ली पोलिसांच्या कर्मचाऱ्याच्या मुलाची हत्या
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पार्किंगच्या किरकोळ वादातून 4-5 अज्ञात तरुणांनी निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये कार पार्किंगवरून दोन पक्षांमध्ये जोरदार भांडण झाले, ज्यामध्ये एका बाजूच्या लोकांनी आधी तरुणाला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याच्यावर विटांनी हल्ला केला. 35 वर्षीय अरुण असे मृताचे नाव असून तो जावळी गावचा रहिवासी आहे. मृत हा दिल्ली पोलिसांच्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा होता. या घटनेशी संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गाझियाबाद पोलिसांनी Ghaziabad Police तातडीने पाच पथके तयार केली असून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST