thumbnail

By

Published : Aug 4, 2023, 9:25 PM IST

ETV Bharat / Videos

Python Ate Monkey : अबब! 13 फूट लांब अजगराने गिळले पूर्ण माकड, Watch Video

रामनगर (उत्तराखंड) : पावसामुळे परिसरात सातत्याने साप बाहेर येत असल्याच्या बातम्या येत आहेत. असाच एक भुकेला अजगर माकडांच्या मागे धावत रामनगरच्या लोकवस्तीत आला. तेथे अजगराने एका माकडाला आपले शिकार बनवले. येथील कुष्ठरोग आश्रमात 13 फूट लांबीचा एक महाकाय अजगर घुसला आणि त्याने एका माकडाला आपले खाद्य बनवले. तेथे उपस्थित असलेल्या इतर माकडांनी हे दृष्य पाहून आरडाओरड करायला सुरुवात केली. माकडांचा आवाज ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांची गर्दी जमली. त्यानंतर काही लोकांनी सेव्ह द स्नेक सोसायटीला याची माहिती दिली. माहिती मिळताच सोसायटीचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अजगरला सुखरूप बाहेर काढले. अजगराची सुटका करून जंगलात सोडण्यात आल्याचे सेव्ह द स्नेक सोसायटीचे अध्यक्ष चंद्रसैन कश्यप यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.