साईचरणी तब्बल 'इतक्या' लाखांचा सुवर्ण हिरेजडीत मुकुट अर्पण; पाहा व्हिडिओ - Shirdi Sai Baba Crown Gift

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

thumbnail
साईचरणी हिरेजडीत मुकुट अर्पण (ETV Bharat Reporter)

शिर्डी (अहमदनगर) Golden Crown Donation : भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक दररोज शिर्डीला येत असतात. तसंच आपल्या इच्छेनुसार अनेकजण साईंच्या झोळीत देणगी टाकतात. अशातच रविवारी (22 सप्टेंबर) एका साईभक्तानं साईबाबांच्या चरणी लाखो रुपयांचा मुकुट अर्पण केलाय. तब्बल 12 लाख 70 हजार रुपये किंमतीचा हा सुवर्ण हिरेजडीत मुकुट असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे. 110 ग्रॅम वजनाचा हा मुकुट असून या साईभक्तानं आपलं नाव गाव न सांगता गुप्तदान केलंय. दरम्यान, हिरे जडीत हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर या साईभक्‍तानं संस्थानला आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केल्याची माहिती गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.