मुंबई World Pharmacist Day 2024 : एखादी व्यक्ती आजारी पडली की लगेच डॉक्टरांकडे जाते आणि औषधं घेते. बरे झाल्यानंतर, तो डॉक्टरांचे आभार मानतो कारण त्यांनी त्याला बरे होण्यास मदत करणारी औषधे घेण्याचा सल्ला दिला. पण या सगळ्यात ही जीवनदायी औषधं कोण बनवतात आणि शोधून काढतात याचा विचार कोणी करत नाही. 'फार्मासिस्ट' ही अशी व्यक्ती आहे जी औषधं तयार करुन रोगांचं निदान करण्यात डॉक्टरांना मदत करते. वैद्यकीय शास्त्रातील फार्मासिस्टच्या योगदानाचं कौतुक करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी 'जागतिक फार्मासिस्ट दिन' साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे फार्मासिस्टचं कौतुक करणे आणि ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हा संदेशही देणं.
जागतिक फार्मासिस्ट दिनाचा इतिहास काय : जागतिक फार्मासिस्ट दिन 25 सप्टेंबर 2009 रोजी सुरु झाला. तुर्कीतील इस्तंबूल इथं आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल्स फेडरेशन (FIP) द्वारे प्रथम जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा करण्यात आला. एफआयपीचे प्रमुख डॉमिनिक जॉर्डन यांनी नोटीस जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. माहितीनुसार, 25 सप्टेंबर 1912 रोजी आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल्स फेडरेशनची स्थापना झाली. म्हणूनच FIT नं आपल्या स्थापना दिवसापासूनच आंतरराष्ट्रीय फार्मासिस्ट दिनाची सुरुवात केली. औषध शोध, संशोधन आणि उत्पादन क्षेत्रातील फार्मासिस्टचे योगदान लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्या कार्याची आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा करणं हा या दिवसाच्या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
- क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या अनेक क्रिकेटपटूंनी एक उत्कृष्ट फार्मासिस्ट म्हणूनही काम केलं आहे, त्या क्रिकेटपटूंबद्दल माहिती :
इयान क्रेग : कॅन्सरशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर वयाच्या 79 व्या वर्षी नोव्हेंबर 2014 मध्ये इयान क्रेग मरण पावला. तेव्हा ऑस्ट्रेलियातील अनेक वृत्तपत्रांनी "फार्मासिस्ट आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट दिग्गज इयान क्रेग यांचे निधन झालं" या आशयाची बातमी छापली. क्रेगनं 1952-53 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वयाच्या 17 व्या वर्षी पदार्पण करत सर्वात तरुण ऑस्ट्रेलियन कसोटी क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्धी मिळवली. पाच वर्षांनंतर, त्यानं 22व्या वर्षी ऑस्ट्रेलियन संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कर्णधारपदही भूषवलं. त्याच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघानं 3-0 असा विजय मिळवला. पण दुर्दैवानं, त्याला हिपॅटायटीसचा त्रास झाला आणि त्यानंतर तो पुढच्या हंगामाला मुकला. आजारपणातर, त्यानं वयाच्या 26 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर क्रेग यांनी सिडनी विद्यापीठात फार्मसीचा अभ्यास केला आणि आपली कारकीर्द बहुतेक फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम केली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी 1957 मध्ये बूट्स फार्मसीमध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंट केमिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढील 35 वर्षे त्यांनी याच कंपनीत काम केलं. त्यांनी ऑस्ट्रेलियन प्रोप्रायटरी मेडिसिन्स असोसिएशनच्या बोर्डावरही काम केलं. क्रेग यांचं एकेकाळी 'नेक्स्ट ब्रॅडमन' असं वर्णन केलं गेलं होतं. परंतु, त्यांच्या आजारपणामुळं आणि कामाच्या बांधिलकीमुळं ते क्रिकेटपटू म्हणून त्यांचं करिअर करु शकले नाही.
ग्लेन हॉल : ग्लेन हॉल हा एक दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू होता. ज्यानं 1965 मध्ये त्याच्या राष्ट्रीय संघासाठी एक कसोटी सामना खेळला होता. एक उंच लेग स्पिनर, गुगली आणि लेगस्पिन या दोहोंमध्ये जलद, त्यानं त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीची उल्लेखनीय सुरुवात केली होती. तो रोड्स विद्यापीठातून पदवीधर झाला. त्यानं माजी मिस दक्षिण आफ्रिकेशी लग्न केलं. त्यांचं वैवाहिक जीवन तसं चांगलं नव्हतं; त्यानं 1980 मध्ये आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर तो मानसिकदृष्ट्या इतका खचला की त्यानं वयाच्या 49 व्या वर्षी आत्महत्या केली.
डॅनियल व्हिटोरी : न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरी, जो आधुनिक क्रिकेटमधील सर्वात कुशल खेळाडूंपैकी एक आहे. त्यानं वयाच्या 18 व्या वर्षी राष्ट्रीय संघात निवड होण्यापूर्वी, वायकाटो विद्यापीठात आरोग्य विज्ञानात प्रवेश घेतला होता. व्हिटोरी हा 100 कसोटी खेळणारा दुसरा न्यूझीलंडचा खेळाडू ठरला.
अजित परेरा : अजित परेरा श्रीलंकेचे माजी क्रिकेट अंपायर व्यवसायानं चार्टर्ड केमिस्ट, विद्वान आणि फार्मा उद्योगातील माजी वरिष्ठ व्यवस्थापक होते.
चिरायू अमीन : राजीव शुक्ला यांच्या आधी आयपीएलचे माजी अध्यक्ष चिरायू अमीन हे अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.
हेही वाचा :