ETV Bharat / entertainment

विकी कौशल स्टारर 'छावा'चा ट्रेलर कधी होईल प्रदर्शित, जाणून घ्या तारीख... - CHHAAVA TRAILER RELEASE DATE

विकी कौशल अभिनीत 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे.

chhaava movie
'छावा' चित्रपट ('छावा 'ट्रेलर रिलीज डेट (movie poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 20, 2025, 1:55 PM IST

मुंबई: अभिनेता विकी कौशल स्टारर बहुप्रतीक्षित चित्रपट 'छावा' 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या अद्भुत टीझरमुळे चाहत्यांमध्ये, चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. आता अनेकजण या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेनं वाट पाहत आहेत. आता लवकरच प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विकीनं 'छावा'चा एक जबरदस्त मोशन पोस्टर रिलीज करून चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

'छावा'चं ट्रेलर होणार 'या' दिवशी प्रदर्शित : विकी कौशलनं 'छावा' चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करून त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. या चित्रपटामध्ये तो शंभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान अद्भुत संगीत, सुंदर लूक आणि दमदार व्हीएफएक्सनं सजवलेले हे मोशन पोस्टर पाहून विकी कौशलचे चाहते त्याचे आता कौतुक करत आहेत. दरम्यान या पोस्टच्या कॅप्शनमध्ये विकीनं लिहिलं, 'तो अग्नी आहे, तो पाणी आहे, तो वादळ आहे आणि तो सिंह शिवाचा पुत्र देखील आहे, 'छावा'चा ट्रेलर 22 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'छावा' 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल.'

प्रेक्षकांना टीझर आवडला : 'छावा' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना खूप आवडला होता. दरम्यान टीझरची सुरुवात एका युद्धभूमीनं होते. विकी कौशल 'छत्रपती संभाजी महाराज' म्हणून प्रवेश करतो आणि पार्श्वभूमीत एक शक्तिशाली संगीत वाजते. यामध्ये तो शत्रूंशी लढताना दिसतो. विकीला त्याच्या नवीन पात्रामध्ये प्रेक्षकांनी खूप पसंत केलं आहे. या चित्रपटाची कहाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. 'छावा' हे एक ऐतिहासिक नाटक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलं आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे. 'छावा' चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि अक्षय खन्ना हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

हेही वाचा :

  1. विकी आणि कतरिना कैफ विमातळावर झाले स्पॉट, नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सज्ज..
  2. विकी कौशल आणि कतरिना कैफ जोधपूरमध्ये त्यांचा लग्नाचा तिसरा वाढदिवस करणार साजरा...
  3. 'स्त्री 2'च्या निर्मात्यांबरोबर चिरंजीवी परशुरामच्या भूमिकेत 'महावतार'मध्ये विकी कौशल दिसेल, फर्स्ट लूक पोस्टर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.