मुंबई- बदलापूर अल्पवयीन मुलींवरील ( badlapur sexual assault case) अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं कथित एन्काउन्टर करणं (Akshay Shinde encounter case) पोलिसांना भोवलं आहे. आरोपीच्या मृत्यू प्रकरणी ५ पोलीस जबाबदार असल्याचं दंडाधिकाऱ्यानं चौकशी आयोगानं अहवालात म्हटलं आहे. हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयासमोर मांडण्यात आलेल्या अहवालात अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. प्रकरणात गुंतलेल्या पाच पोलिसांविरोधात फौजदारी प्रक्रियेद्वारे खटला चालवण्यात येईल. या प्रकरणी अॅड अजिंक्य गायकवाड आणि अॅड कविशा खन्ना यांनी यामध्ये मुळ तक्रार दाखल केली होती. या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्याविरोधात फौजदारी खटला चालवण्याची मागणी न्यायालयासमोर केली आहे. वकिलांच्या मागणीनंतर न्यायालयानं या प्रकरणी सरकारी वकिलांना या मागणीची दखल घेण्याचे निर्देश दिले आहेत.
सुनावणीत काय झाले?
- अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. अक्षय शिंदेच्या कथित एन्काउन्टर प्रकरणी न्यायालयानं दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले होते. त्याचा अहवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सोपवण्यात आला. अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे बंदुकीवर नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सरकारी वकिलांनी या प्रकरणी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असं न्यायालयाला सांगितलं. या मुद्द्यावर पुढील सुनावणी वेळी युक्तिवाद केला जाईल. या प्रकरणी पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर ठेवण्यात आली आहे.
काय आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण- बदलापूरमधील एका शाळेच्या शौचालयात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी नागरिकांचा मोठा उद्रेक झाला होता. आरोपीला अटक करण्याची मागणी करत नागरिकांनी दिवसभर उपनगरीय रेल्वे सेवा रोखली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये अक्षय शिंदेला करण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये, चौकशीसाठी तळोजा तुरुंगातून नेले जात असताना पोलिसांच्या कथित गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या दाव्यानुसार पोलीस व्हॅनमध्ये असताना आरोपीनं पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला.
हेही वाचा-