ETV Bharat / entertainment

कंगना रणौतला एकदाही भेटले नाहीत पंतप्रधान मोदी, अभिनेत्रीची खंत, म्हणाली, '2014 पासून..." - PM MODI NEVER MET KANGANA RANAUT

कंगना रणौत भाजपाच्या लोकसभा खासदार आहे. परंतु 2014 पासून आजपर्यंत कंगना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकदाही बातचीत झालेली नाही.

KANGANA RANAUT AND NARENDRA MODI
कंगना रणौत आणि पंतप्रधान मोदी ((Photo - ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 20, 2025, 1:46 PM IST

मुंबई - कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट सध्या रिलीज झालाय. या चित्रपटाला संमिश्र रिव्ह्यू मिळाले आहेत. परंतु बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई होऊ शकलेली नाही. पहिल्या विकेंडला एकूण कमाई 10 कोटी 45 लाखापर्यंत पोहोचली आहे. हा सिनेमा 60 कोटीच्या बजेटमध्ये बनला असल्याचं सांगितलं जात. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अनेक अडथळे आले आणि त्यामुळे आर्थिक फटकाही बसल्यानं कंगनानं आपली प्रॉपर्टी गहान ठेवून हा सिनेमा बनवला आहे. या चित्रपटाला पंजाबमधून मोठा विरोध झाला, विरोधी पक्षांनी चित्रपट प्रचारकी असल्याची टीका केली आहे. यापार्श्वभूमीवर कंगनानं शुभंकार मिश्रा यांच्या यूट्यूबवरील ब्रॉडकास्टमध्ये अनेक खुलासे केले आहेत. याध्ये तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अद्याप भेटून चर्चा केली नसल्याचाही खुलासा केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

पंजाबी गायक दिलजीत दोसंझ यानं काही काळापूर्वी एक भूमिका घेताना हा देश कुणाच्या बापाचा नसल्याचं' म्हटलं होतं. तरीही त्याच्याशी जुळवून घेण्यात आलं. काही दिवसापूर्वी तर दिलजीत यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गप्पाही मारल्या होत्या. याची आठवण करुन दिल्यानंतर कंगनाला विचारण्यात आलं की तिनं यापूर्वी किती वेळा पंतप्रधानांना भेटली आहे. यावर ती म्हणाली की, 'मला त्यांना भेटायची इच्छा आहे. यापूर्वी त्यासाठी प्रयत्नही केले आहेत. परंतु 2024 पासून तिला एकदाही पंतप्रधानांशी भेटता, बोलता किंवा चर्चाही करता आलेली नाही.' नरेंद्र मोदी जेव्हा कंगनाच्या मंडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. तेव्हा ती मंचावर त्यांच्या शेजारी बसली होती. तिनं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागतही केलं होतं. मात्र त्याही वेळी त्यांनी एकमेकांशी बातचीत केली नव्हती. केवळ त्यांच्याबरोबर तिला सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी फोटो काढण्याची संधी मिळाली होती.

या मुलाखतीत कंगनानं सोनू सूदशी झालेल्या वादावरही भाष्य केलं. 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटात ती झाशीच्या राणीची भूमिका करत होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिश जगरलामुडी करत होते. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर याचं पॅचवर्क सीन्स बाकी होते. मात्र क्रिश यांना दुसऱ्या चित्रपटाच्या कामामुळं वेळ नव्हता. यानंतर दिग्दर्शक म्हणून कंगनानं धुरा सांभाळली आणि सोनू सूदच्या व्यक्तिरेखेची लांबी कमी केली. यामुळे दोघांच्यात मतभेद झाल्याचं सांगितलं जातं. आजकाल दोघं एकमेकांशी बोलत नसल्याबद्दल विचारलं असता कंगना म्हणाली की, “आपण भेटणाऱ्या प्रत्येकाशी मैत्री करणं महत्त्वाचे नाही. तुम्ही फक्त इतकेच मित्र बनवता. जे माझ्यावर नाराज आहेत त्यांनी माझ्यावर नाराज राहावं.”

यापूर्वी, सोनूनंही कबूल केलं होतं की त्याचे आणि कंगना यांचे आता बोलणं बंद आहे. परिस्थितीचा विचार करताना तो म्हणाला होता, “लोक जे काही बोलू शकतात ते बोलू शकतात, परंतु, मी त्यांच्याविरुद्ध कधीही काहीही बोलणार नाही. ‘ही व्यक्ती एक चांगली मैत्रीण होती आणि तिने अशा गोष्टी सांगितल्या’ असे विचारून मला वाईट वाटंल. मला वाटतं की हा तिचा मूर्खपणा आहे, ती वाईट व्यक्ती नाही. पण कधीकधी, जेव्हा तुम्ही काही लिहिता किंवा बोलता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्याचा विचारही करत नाही. मणिकर्णिका नंतर आम्ही कधीही एकमेकांशी बोललो नाही, हे खरं आहे.”

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.