मिरा भाईंदर Life Line Hospital : मिरारोडच्या लाईफलाईन रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी वाचमेनच्या कानाखाली मारली. या प्रकरणी रुग्णालयातील स्टाफ आक्रमक झाला आहे. संतप्त झालेल्या इतर कर्मचाऱ्यांनी नातेवाईकाची चारचाकी वाहनाची तोडफोड केली. परिणामी कर्मचारी विरुद्ध नातेवाईक असा वाद निर्माण झाला होता. याबाबतची माहिती मिळताच नयानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यात दोषीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती, नयानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली.
स्टाफ धावला रस्त्यावर : मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास रुग्णालयात एका रुग्णाला दाखल करण्यासाठी आणले होते. त्यावेळी रुग्णालयाच्या गेटवर असलेल्या वॉचमने गेट उशिरा उघडल्याने रुग्णाच्या नातलगाकडून वॉचमनला मारहाण करण्यात आली. त्यानंतर या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आपल्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळं आक्रमक झालेल्या रुग्णालय स्टाफने सदर मारहाण करणाऱ्या तरुण आणि तरुणीच्या दिशेने मारहाण करण्यासाठी धावतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. रुग्णालयातील स्टाफ रुग्णालयाच्या बाहेर रस्त्यावर धावताना व्हिडिओ मध्ये दिसत आहे. यावेळी रुग्णालयात एकच गोंधळ निर्माण झाला होता. रुग्णालयातील इतर रुग्णांमध्ये देखील काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
गुन्हा दाखल होणार : रुग्णालयात दाखल करण्यात आलेली महिला घाबरली आहे. तर घटनास्थळी नयानगर पोलीस दाखल झाले. जो कोणी दोषी असेल त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती, नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली. तर घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा -