काँग्रेसचा बालेकिल्ल्यात ठाकरेंची मशाल पेटणार? भोर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा 'शिवसंवाद' दौरा - Vidhan Sabha Election 2024 - VIDHAN SABHA ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 24, 2024, 4:06 PM IST
पुणे Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झालीय. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गुडघ्याला बाशींग बांधलंय. जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीत भोर विधानसभा मतदार संघाच्या जागेवरून कुजबुज पाहायला मिळतेय. भोर विधानसभेत ज्याची निवडून यायची क्षमता तोच उमेदवार, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भोर विधानसभेवर आपला दावा केलाय. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी आज भोरमधून शिवसंवाद दौरा करत, जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. रायरेश्वर किल्ल्यावरून मांडेकर यांनी आपल्या शिवसंवाद दौऱ्याची सुरूवात केली.
भोर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून या मतदार संघातून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे तीन वेळा निवडून आलेत आहेत. मात्र, आता ठाकरेंच्या शिवसेनेनं या मतदार संघावर दावा करत जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवून दिलीय. त्यामुळं या दौऱ्याची चांगलीच चर्चा रंगत आहे.