ठाणे- 19 वर्षीय प्रेयसीनं लग्नाचा तगादा लावला असताना प्रियकरानं लग्नाचं आमिष दाखवून पीडित प्रेयसीवर अत्याचार केला, त्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला करून तिला जखमी करून गंभीर अवस्थेत टाकून पळून गेला. नराधम प्रियकराला कोनगाव पोलिसांनी अटक केली असून, कुणाल पासवान असे अटक प्रियकराचे नाव आहे. त्याने पीडितेच्या मानेवर आणि हातावर कटरने वार केल्याने पीडितेवर मुंबई येथील जे जे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांनी दिलीय.
मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरवली गावातील 19 वर्षीय पीडित तरुणी कुटुंबासह राहते. तिचे त्याच भागात राहणाऱ्या कुणाल पासवान याच्यासोबत मैत्री होती, त्यातच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घरातील कोणालाही न सांगता पीडित तरुणी कुठेतरी निघून गेल्याची तक्रार तिच्या पालकांनी कोनगाव पोलीस ठाण्यात 12 फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास दिली. मात्र त्याच दिवशी काही तासातच सकाळी पीडितेच्या नातेवाईकांना पोलिसांनी फोन करून तुमच्या मुलीवर चाकूने हल्ला झाला असून, तिला जखमी अवस्थेत रस्त्यावर टाकून आरोपी फरार झाल्याची माहिती दिली.
रिक्षाचालकाने तरुणीला रुग्णालयात केले दाखल : तर दुसरीकडे पीडित तरुणीला गंभीर जखमी पाहून एका रिक्षा चालकाने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानं पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र पीडितेची प्रकृती गंभीर असल्याने पीडितेला पुढील उपचारासाठी मुंबई जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मुंबई येथील रुग्णालयात जाऊन पीडितेकडे चौकशी केली असता कुणाल पासवान याने आपण लग्न करू, असे आश्वासन देत अत्याचार केल्याचं सांगितलं.
पीडितेस त्याच्या घरी नेतो सांगून वार : आरोपी कुणाला पासवान याने पीडितेस त्याच्या घरी नेतो, असे सांगून सरवली गावाच्या पुढील रोडवर नेऊन धारदार कटरने तिच्या मानेवर तसेच हातावर वार केल्यानं त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पोलीस कोठडी संपल्यानं आरोपीला पुन्हा आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्केंनी दिलीय.
हेही वाचा -
प्रेयसीवर अत्याचार करून धारदार शस्त्राने हल्ला; प्रियकराला अटक - ASSAULTING GIRLFRIEND
पीडितेच्या मानेवर आणि हातावर कटरने वार केल्याने पीडितेवर मुंबई येथील जे जे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांनी दिलीय.

Published : Feb 17, 2025, 7:25 PM IST