ETV Bharat / health-and-lifestyle

आंघोळ करताना लघवी केल्यास काय होतं? जाणून घ्या तज्ञ काय सांगतात - PEEING IN THE SHOWER GOOD OR BAD

आपल्यापैकी बरेज जण आंघोळ करताना लघवी करतात. परंतु हे कितपत सुरक्षित आहे वाचा सविस्तर..

URINE DURING BATH IS GOOD OR BAD  IS IT BAD TO PEE IN YOUR BATH WATER  PEEING IN THE SHOWER GOOD OR BAD
आंघोळ करताना लघवी करणं चांगलं की वाईट (Freepik)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Feb 20, 2025, 12:14 PM IST

Updated : Feb 20, 2025, 1:33 PM IST

Peeing In The Shower Good Or Bad: अनेक जण आंघोळ करताना लघवी करतात. एका संस्थेनं केलेल्या सर्व्हेक्षणात, 58 टक्के लोक आंघोळीच्या वेळी लघवी करतात, अशी बाब समोर आली आहे. तसंच ब्रिटेनमध्ये झालेल्या अन्य एका सर्व्हेक्षणात, शॉवर घेताना लघवी केल्याचे अर्ध्याहून अधिक पुरुषांनी कबूल केलं आहे. त्यामुळे या सवयीचे फायदे आणि तोट्यांबाबत जाणून घेणं फार गरजेचं आहे. लघवी करण्याच्या या पद्धतीमुळे आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवतात का? याबाबत तज्ञ काय म्हणतात जाणून घेऊयात.

URINE DURING BATH IS GOOD OR BAD  IS IT BAD TO PEE IN YOUR BATH WATER  PEEING IN THE SHOWER GOOD OR BAD
आंघोळ करताना लघवी करणं चांगलं की वाईट (Freepik)
  • असं केल्यास पाण्याची बचत होते का?

तज्ञांचे म्हणणे आहे की, आंघोळ करताना लघवी केल्याने पाण्याची बचत होते. अमेरिकेतील एका कंपनीचे म्हणणे आहे की, आंघोळ करताना आता 3 लिटरपेक्षा कमी पाणी लागते. जुन्या पिढीतील शॉवरमध्ये प्रति फ्लश किमान 10 लिटर पाणी वापरले जात असल्याचे उघड झाले. परिणामी, दररोज 350 लिटरपेक्षा जास्त पाणी वापरले जात असल्याचे स्पष्ट झालं आहे. तज्ञांच्या मते, आंघोळ करताना लघवी केल्याने फ्लशिंग वॉटरची बचत होते आणि ते पर्यावरणासाठी चांगले आहे.

  • कोणती समस्या उद्भवणार?

तज्ञांचं म्हणणं आहे की, आंघोळ करताना लघवी केल्यानं कोणतीही समस्या उद्भवत नाही. जरी ते हानिकारक नसलं तरी, डॉ. निकेत सोनपाल यांनी वैयक्तिक स्वच्छतेचं पालन करण्याचं सुचवलं आहे. मूत्राशयाच्या संसर्गाने ग्रस्त असलेल्या लोकांच्या मनात भिती होती की, अंघोळीदरम्यान लघवी केल्यानं इतरांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो. हे तेवढं खरं नसलं तरी सोनपाल यांच्या मते, पायाला दुखापत झाली असेल तर हे विशेषतः धोकादायक आहे. घरातील सर्व लोक एकच बाथरूमचा वापर करत असणार तर हे हानिकारक ठरू शकतं. खाजगी बाथरूम वापरणे अधिक सुरक्षित आहे. घरातील सर्व जण ज्या बाथरूममध्ये आंघोळ करतात, अशा ठिकाणी आंघोळीदरम्यान लघवी केल्यास ती जागा स्वच्छ करण्याची शिफारस त्यांनी केली. 2018 मध्ये जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या "द हायजिन ऑफ युरिनल" या अभ्यासातही हे आढळून आले. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या डॉ. जेन स्मिथ यांनी यामध्ये भाग घेतला होता.

जगभरातील अनेक देशांमध्ये असं मानलं जाते की, पायांवर लघवी केल्याने संसर्ग आणि त्वचेच्या संबंधित समस्या बऱ्या होतात. असं म्हटलं जातं की, लघवीमध्ये युरिया असते. जे अनेक समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु तज्ञांनी असे उघड केले आहे की यावर कोणतेही संशोधित पुरावे नाहीत. लघवीमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी सुरक्षित नाहीत.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

Last Updated : Feb 20, 2025, 1:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.