ETV Bharat / sports

आंतरराष्ट्रीय कुस्तीत भारतीय पैलवानच 'लय भारी'; जामनेरमध्ये अमृता पुजारी आणि विजय चौधरीचं वर्चस्व - INTERNATIONAL WRESTLER COMPILATION

जामनेर शहरात आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेत तब्बल 9 देशांचे दिग्गज कुस्तीपटू सहभागी झाले.

विजय चौधरी
विजय चौधरी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 17, 2025, 8:00 PM IST

जामनेर International Wrestling Competition : कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पैलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ 2 अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पैलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरिल परदेशी पैलवानांना धूळ चारत आपलं वर्चस्व दाखवून दिलं.

महिलांचाही कुस्तीचि सामना : देवाभाऊ केसरीच्या निमित्तानं‌ आयोजित आंतरराष्ट्रीय दंगलमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पैलवानांना पराभूत करत कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. विशेष म्हणजे यावेळी कुस्तीत महिलांना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि शेवटची कुस्ती महिलांची लावण्यात आली. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळाल्यामुळं महिला कुस्तीपटूंमध्ये आणि कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण दिसलं.

अमृता पुजारी
अमृता पुजारी (ETV Bharat)

हजारोंचा जनसागर : आपल्या तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पैलवान येणार असल्यामुळं आज पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा जनसागर पसरला होता. महाराष्ट्र केसरी विजेत्या अमृता पुजारीनं रोमानियाच्या ऑलिम्पियन कॅटालिना क्सेन्टनं हिच्यावर वर्चस्व गाजवत विजय मिळविला. शेवटच्या कुस्तीमध्ये अमृतानं उत्कृष्ट डावपेच आणि चपळाईनं गुण मिळवत आपला पराक्रम सिद्ध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विश्वविजेता व ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची कुस्तीला सलामी देण्यात आली. सर्व विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.

भारतीय खेळाडूंंचा एकहाती दबदबा : जामनेरमध्ये झालेल्या या दंगलीत विजय चौधरीनं दबदबा दाखवताना आशियाई विजेता उझबेकिस्तानच्या सुक्सरोब जॉनला केवळ दोन मिनिटांत चीतपट करत प्रेक्षकांची मनं जिंकली. पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बांगडीनं फ्रान्सच्या वर्ल्ड चॅम्पियन अंजलीक गोन्झालेझ हिच्यावर सहज विजय मिळवला. तिच्या अचूक चालींमुळं तिनं विरोधकाला गुण मिळवण्याची संधी दिली नाही. तसंच, महाराष्ट्र केसरी विजेती सोनाली मंडलिकनं एस्टोनियाच्या मार्टा पाजूला हिला पराभूत करून प्रथम गुण घेत प्रभावी विजय मिळवला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं युरोपियन चॅम्पियन मोल्दोवाच्या घेओघे एरहाणला चितपट करत आपली ताकद सिद्ध केली. तसेच, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने जॉर्जियाच्या वर्ल्ड चॅम्पियन इमामुकवर विजय मिळवत भारतीय कुस्तीतील स्वतःचे स्थान भक्कम केलं.

9 देश सहभागी : या सर्व कुस्त्यासाठी पंच आणि संयोजक म्हणून हिंदकेसरी रोहित पटेल यांनी काम पाहिले. तर शेवटच्या 3 कुस्त्यांसाठी पंच म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी काम पाहिले. 9 देशांच्या या स्पर्धेत भारत, फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया या देशाचे खेळाडू सहभागी झाले होते.

दिग्गजांची उपस्थिती : सलग 11 तास चाललेल्या या कुस्तीदंगलमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, अनिल पाटील, आमदार सर्वश्री सुरेश भोळे (राजूमामा), मंगेश चव्हाण, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे रामदास तडस, जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधनाताई महाजन, कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, विविध देशांतून आलेले कुस्तीपटू आणि ५० हजारपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींनी उपस्थिती लावली.

कुस्तीत महाराष्ट्राचा दबदबा - मुख्यमंत्री : "जागतिक पटलावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे, ही अभिमानास्पद बाब आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं. त्यांनी ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ व एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केलं. "मागील काही काळात मॅटवरील कुस्तीला अधिक प्राधान्य मिळालं होतं, मात्र आता मातीवरील कुस्तीनं दमदार पुनरागमन केलं आहे. कुस्तीच्या माध्यमातून भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव होते. आज विजय चौधरी, सोनाली मंडलिक यांसारखे खेळाडू परदेशी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आहेत," असंही त्यांनी सांगितलं. या स्पर्धेत नऊ देशांतील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सहभागी झाल्याने ती अधिक रोमांचक ठरली. तसंच, "गिरीश महाजन यांनी विद्यापीठ स्तरावर कुस्तीमध्ये चांगली कामगिरी केली होती. आज राजकारणातही त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना चित केलं आहे!" अशी मिश्कील टिप्पणी करत त्यांनी गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं.

हेही वाचा :

  1. आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू फिजा सय्यद साईचरणी लीन..., पाहा व्हिडिओ
  2. पाकिस्तानला भारतीय तिरंग्याची ॲलर्जी... सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओनं खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.