Sand Theft in Pune : पुण्यात तहसिलदार तृप्ती कोलते यांची भरपावसात धडक कारवाई; वाळू चोरी करणारे जेसीबी व ट्रॅक्टर जप्त - Tripti Kolte Has Taken Action Against The Sand Stealer

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 5, 2022, 12:47 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

पुणे - वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध कारवाई करण्यात येत असते. पुणे शहरात काल रात्री भर पावसात महिला तहसीलदार तृप्ती कोलते ( Tehsildar Tripti Kolte ) पाटील यांनी कारवाई केली. या धडक कारवाईत वाळू चोरी करणारे एक जेसीपी आणि ट्रॅक्टर ट्रॉली जप्त ( JCB and tractor trolley confiscated ) करण्यात आले आहे. या प्रकरणी वारजे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून शिवणे येथे नदीपात्रात जेसीपी चालला आहे, अशी माहिती आल्यानंतर तातडीने तहसीलदार कोलते पाटील यानी नदीपात्राच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी नदी पात्रामधून नुकतेच बाहेर पडताना एक जेसीपी मशीन त्यासोबत ट्रॅक्टर, व ट्रॉली मध्ये वाळू चाळायची चाळण यांच्यासह मुद्देमाल जप्त करून वारजे पोलीस स्टेशन ( Warje Police Station ) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस ( Pune Police ) करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.