शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज शुभारंभ, भव्य रथयात्रेनं रसिकांचं वेधलं लक्ष

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 5:35 PM IST

पुणे Pune Natya Sammelan : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज शुभारंभ झाला.  सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य रथयात्रा आणि बाईक रॅलीत आज पारंपारिक वेशभूषा केलेले पुरुष, नऊवारीत नटलेल्या महिला, सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि मराठी रंगभूमीवरील अजरामर अशा 100 कलाकृतींनी नाट्यरसिकांचे लक्ष वेधून घेतले. रथयात्रा आणि बाईक रॅली गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोहोचली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत रंगमंच पूजन तसेच प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन आज कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे. बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीडामंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निघालेल्या या भव्य शोभायात्रेत 300 दुचाकी, 10 रथावर विराजमान झालेले ज्येष्ठ कलाकार सहभागी झाले. शोभायात्रेत १०० विविध नाटकांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या 100 व्यक्तिरेखांचा समावेश दिसून आला.  शुभारंभात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, नाटय परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पुणे शाखेचे विजय पटवर्धन यांच्यासह पुण्यातील कलावंत, नाटय परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.