नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो, काळाराम मंदिरात घेतलं दर्शन - उपमुख्यमंत्री अजित पवार
🎬 Watch Now: Feature Video


Published : Jan 12, 2024, 2:17 PM IST
नाशिक Pm Modi Road Show in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकला भेट देऊन रोड शो केला. त्यामुळं नाशिक शहर मोदीमय झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो करत काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीकाळ भजनही केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यानं नाशिकमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. नाशिकमध्ये असलेल्या यशवंत व्यायाम शाळेच्या मल्लांनी मल्लखांबावर विविध प्रात्याक्षिकं करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं. तर आदिवासी कलावंतांनी परंपरागत नृत्य करत भारतीय संसकृतीचं दर्शन घडवलं. यावेळी वेगळपण म्हणून नाशिकमधील शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बँड बाजवत प्लॅस्टिक वापर कमी करुन त्याचं रिसायकल करण्याचा सल्ला दिला. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक शहरात असल्यानं नागरिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत त्यांचं स्वागत करत आहेत.