Osho Sambodhi Day: आचार्य रजनीश ओशो यांचा आश्रमात अडीच ते तीन हजार ओशो शिष्य दाखल - Acharya Rajneesh Osho
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : आज जगभरातून अडीच ते तीन हजार ओशो शिष्य हे कोरेगाव पार्क येथील आश्रम परिसरात दाखल झाले आहेत. कारण आहे आचार्य रजनीश ओशो यांचा आज ७० वा संबोधी दिवस. या निमित्ताने आश्रमातील ओशोंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आत जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आश्रम प्रशासन आणि ओशो भक्तांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. ओशो आश्रम मधील जागा आणि भक्तांना माळा घालून आश्रमात आत मध्ये जाऊ दिले जाते नव्हते. या विरोधात भक्तांकडून अनेक वेळा आंदोलन देखील करण्यात आले होते. आज शेवटी पोलीस प्रशासन आणि ओशो प्रशासन यांच्या वतीने आज ठरवून माळा घालून आत मध्ये ओशो भक्तांना जाऊ दिले जात आहे. या आधी ओशो दीक्षा माळा घालून आत जाण्यास प्रतिबंध करण्यात आल होत. याविरोधात ओशो आश्रम वाचवण्याच्या मागणीसाठी हे सर्व ओशो शिष्य वेळोवेळी आंदोलन करण्यात येत होते.आज जरी आम्हाला माळा घालून आम्हाला आत मध्ये जाऊ देत असले तरी उद्यापासून आम्हाला पुन्हा रोखण्यात येणार आहे. पण आम्ही आमचा संघर्ष सुरू ठेवणार आहोत असा यावेळी भक्तांकडून सांगण्यात आले आहे.