Video भाऊबीज निमित्ताने रेड्यांची मिरवणूक, मशाल चिन्ह रंगवून केले शक्तिप्रदर्शन - पारंपरिक रेड्यांची मिरवणूक
🎬 Watch Now: Feature Video
मनमाड पाडवा आणि भाऊबीज निमित्त मनमाडला गवळी समाजातर्फे रेड्यांची मिरवणूक काढण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. Torch symbol कोरोनामुळे 2 वर्षे ही परंपरा खंडित झाली होती. मात्र आता सर्व सण उत्सव धूमधडक्यात साजरे केले जात असल्याने रेड्यांची मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली. रेडयांना आकर्षक पद्धतीने सजवून ढोल तश्याच्या गजरात त्यांची मिरवणूक काढून त्यांना गवळी समाजाच्या लक्ष्मी आई मंदिरात दर्शनासाठी आणण्यात आले होते. यात शिवसेनेचे नवीन चिन्ह मशाल काढुन शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मशाल आणि शिवसेनेचे चिन्ह सर्वांचे आकर्षण, शिंदे गट आणि ठाकरे गट हे दोन्ही आपले शक्तिप्रदर्शन करणं सोडत नाही. मनमाड येथे पारंपरिक रेड्यांची मिरवणूक काढली होती. यात त्यांनी रेड्यांच्या अंगावर शिवसेनेचे नवीन चिन्ह मशाल व वाघ काढून डिजेवर शिवसेनेचे गाणे वाजवून शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST