Navratri Festival : नवरात्रीमध्ये भूमी त्रिवेदीचा गरबा परफॉर्मन्स असणार विनामूल्य, पहा व्हिडिओ - संजय लीला भन्साळी
🎬 Watch Now: Feature Video


Published : Sep 13, 2023, 11:01 PM IST
मुंबई Navratri Festival : उत्तर मुंबई दांडियाचा बालेकिल्ला बनत आहे. यावेळी उत्तर मुंबईत 5 मोठ्या दांडियाचं आयोजन करण्यात आलंय. त्यापैकी फाल्गुनी पाठक यांचा दांडिया कार्यक्रम सर्वात प्रसिद्ध आहे. यावेळी देखील भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मोफत दांडियाचं आयोजन करण्यात आले आहे. बोरिवलीमध्ये पिनाकिन भाई यांच्याकडून भव्य दांडियाचं आयोजन केलं जात आहं. ज्यांचे प्रमुख मार्गदर्शक दांडिया क्वीन भूमी त्रिवेदी आहेत. भूमी त्रिवेदीचा गरबा परफॉर्मन्स "रंगरस" नवरात्री 2023 मध्ये विनामूल्य असेल, असं आयोजक प्रवीण दरेकर, पिनाकिन शाह यांच्या टीमनं माहिती दिलीय. नवरात्रीनिमित्त मुंबईत अनेक ठिकाणी गरब्याचे कार्यक्रम पाहायला मिळतात. यंदा बोरिवलीत गरबा उत्साहात साजरा होणार आहे. यावेळी संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला, राम-लीला’ या क्लासिक चित्रपटातील ‘राम चाहे लीला’ हे सुपरहिट गाणे गाणाऱ्या गायिका भूमी त्रिवेदी सर्वांचे मनोरंजन करणार आहे.