Mumbai Customs Seize Diamonds: मुंबई विमानतळावर हिरे तस्करी, आरोपीने हिरे लपविण्यासाठी लढवली 'ही' अनोखी शक्कल - इंडिगो एअरलाइन्स
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर 9 ऑगस्टला मुंबई एअर कस्टम्सने मोठी कारवाई केली आहे. एका दुबईला जाणाऱ्या तस्कराला हिऱ्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. या तस्कराकडे दीड कोटी रुपये किमतीचे हिरे सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ते हिरे लपवण्यासाठी या तस्कराने अनोखी शक्कल लढवली होती. कस्टम अधिकार्यांनी सांगितले की, जप्त केलेले हिरे आरोपीने चतुराईने चहाच्या पाकिटात लपवले होते. या तस्कराच्या सामानाची तपासणी केली असता, त्यामध्ये एक चहा पावडरचे पाकीट सापडले. ते जप्त करून त्याची तपासणी करण्यात आली. ते पॅकेट उघडल्यानंतर एजन्सीच्या अधिकाऱ्यांना त्यात छोटे पाउचेस सापडले होते. सामानात सापडलेल्या या हिऱ्यांचे वजन 1,559.68 कॅरेट्स होते. याआधी, कोचीन कस्टम अधिकाऱ्यांनी शुक्रवारी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाच्या मागील टॉयलेटमधून सुमारे 85 लाख रुपयांचे सोने जप्त केले होते.