आमदार गोपीचंद पडळकरांना मराठा समाजाकडून धक्काबुक्की - गोपीचंद पडळकरांना धक्काबुक्की
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/09-12-2023/640-480-20227910-thumbnail-16x9-marathaandolan.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Dec 9, 2023, 9:10 PM IST
|Updated : Dec 10, 2023, 3:10 PM IST
बारामती (पुणे) Gopichand Padalkar: इंदापुरात ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यानंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना मराठा बांधवांकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. (Maratha Reservation Issue) इंदापुरात गेल्या 47 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणा शेजारीच दुधाला दरवाढ मिळण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला भेट देण्यासाठी गोपीचंद पडळकर सभा संपल्यानंतर जात होते. (Fast for Maratha Reservation) या दरम्यान मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी 'पडळकर गो बॅक' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पडळकर यांना धक्काबुक्की करत त्यांच्या अंगावर चपला फेकल्याचा देखील प्रकार घडला आहे.